YASHADA UTKARSH
Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyan
School Education and Sports Department
Government of Maharashtra
    उत्कर्ष
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र शासन
RMSA

UTKARSH
UTKARSH
Upgrading Teachers' Knowledge and Attitude towards Reforming ScHools
PDF Print E-mail

प्रस्तावना

सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे उच्च प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची निकड भासू लागली आणि त्यातूनच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची निर्मिती झाली.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान : भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने 11 व्या पंचवार्षिक योजनेत तब्बल 20,120 कोटी रुपयांची तरतूद करुन देशातील माध्यमिक शिक्षणासाठी "राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान" हा उपक्रम सन 2009-10 पासून सुरु केला आहे. सन 2017 पर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे. प्रथमत: 8वी, 9वी, 10 वी साठी पुरस्कृत केलेल्या ह्या उपक्रमात अंमलबजावणीपासून जास्तीत जास्त दोन वर्षांच्या आत उच्च माध्यमिक स्तराचाही समावेश केला जाणार आहे. हे अभियान मुख्यत: माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, गुणवत्तावाढ आणि माध्यमिक शिक्षणाची समानसंधी या उद्दिष्टांवर आधारित आहे.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची उद्दिष्टे

  • Gross Enrolment Ratio राष्ट्रीय स्तरावर 52 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांवर आणि राज्य स्तरावर 69 टक्क्यांवरुन 90 टक्क्यांवर आणणे.
  • माध्यमिक शिक्षणाच्या पूर्तीमध्ये अपंगत्व, दुर्बल आर्थिक परिस्थिती, प्रतिकूल सामाजिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती किंवा लिंगभेद यामुळे येणार अडथळे दूर करणे.
  • सर्व माध्यमिक शाळा, शासनाने ठरविलेल्या किमान निकषांपर्यंत आणणे.
  • सन 2017 पर्यंत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे.
  • सन 2020 पर्यंत माध्यमिक शिक्षणाची गळती शून्यापर्यंत आणणे.