YASHADA UTKARSH
Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyan
School Education and Sports Department
Government of Maharashtra
    उत्कर्ष
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र शासन
RMSA

UTKARSH
UTKARSH
Upgrading Teachers' Knowledge and Attitude towards Reforming ScHools

RMSA at a Glance...

 • Introduction
 • About the Mission
 • Objectives

 

सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे उच्च प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची निकड भासू लागली आणि त्यातूनच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची निर्मिती झाली....

 

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने 11 व्या पंचवार्षिक योजनेत तब्बल 20,120 कोटी रुपयांची तरतूद करुन देशातील माध्यमिक शिक्षणासाठी "राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान" हा उपक्रम सन 2009-10 पासून सुरु केला आहे. सन 2017 पर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे. प्रथमत: 8वी, 9वी, 10 वी साठी पुरस्कृत केलेल्या ह्या उपक्रमात अंमलबजावणीपासून जास्तीत जास्त दोन वर्षांच्या आत उच्च माध्यमिक स्तराचाही समावेश केला जाणार आहे. हे अभियान मुख्यत: माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, गुणवत्तावाढ आणि माध्यमिक शिक्षणाची समानसंधी या उद्दिष्टांवर आधारित आहे...

 • Gross Enrolment Ratio राष्ट्रीय स्तरावर ५२ टक्क्यांवरुन ७५ टक्क्यांवर आणि राज्य स्तरावर ६९ टक्क्यांवरुन ९० टक्क्यांवर आणणे.
 • माध्यमिक शिक्षणाच्या पूर्तीमध्ये अपंगत्व, दुर्बल आर्थिक परिस्थिती, प्रतिकूल सामाजिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती किंवा लिंगभेद यामुळे येणार अडथळे दूर करणे
 • सर्व माध्यमिक शाळा, शासनाने ठरविलेल्या किमान निकषांपर्यंत आणणे
 • सन 2017 पर्यंत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे
 • सन 2020 पर्यंत माध्यमिक शिक्षणाची गळती शून्यापर्यंत आणणे

Announcement

Messages


Warning: strtotime(): It is not safe to rely on the system's timezone settings. You are *required* to use the date.timezone setting or the date_default_timezone_set() function. In case you used any of those methods and you are still getting this warning, you most likely misspelled the timezone identifier. We selected the timezone 'UTC' for now, but please set date.timezone to select your timezone. in /home/stpeapwl/public_html/yashada/utkarsh/libraries/joomla/utilities/date.php on line 56

Warning: date(): It is not safe to rely on the system's timezone settings. You are *required* to use the date.timezone setting or the date_default_timezone_set() function. In case you used any of those methods and you are still getting this warning, you most likely misspelled the timezone identifier. We selected the timezone 'UTC' for now, but please set date.timezone to select your timezone. in /home/stpeapwl/public_html/yashada/utkarsh/libraries/joomla/utilities/date.php on line 198

Warning: date(): It is not safe to rely on the system's timezone settings. You are *required* to use the date.timezone setting or the date_default_timezone_set() function. In case you used any of those methods and you are still getting this warning, you most likely misspelled the timezone identifier. We selected the timezone 'UTC' for now, but please set date.timezone to select your timezone. in /home/stpeapwl/public_html/yashada/utkarsh/libraries/joomla/utilities/date.php on line 198
PDF Print E-mail

प्रस्तावना

सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे उच्च प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची निकड भासू लागली आणि त्यातूनच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची निर्मिती झाली.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान : भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने 11 व्या पंचवार्षिक योजनेत तब्बल 20,120 कोटी रुपयांची तरतूद करुन देशातील माध्यमिक शिक्षणासाठी "राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान" हा उपक्रम सन 2009-10 पासून सुरु केला आहे. सन 2017 पर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे. प्रथमत: 8वी, 9वी, 10 वी साठी पुरस्कृत केलेल्या ह्या उपक्रमात अंमलबजावणीपासून जास्तीत जास्त दोन वर्षांच्या आत उच्च माध्यमिक स्तराचाही समावेश केला जाणार आहे. हे अभियान मुख्यत: माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, गुणवत्तावाढ आणि माध्यमिक शिक्षणाची समानसंधी या उद्दिष्टांवर आधारित आहे.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची उद्दिष्टे

 • Gross Enrolment Ratio राष्ट्रीय स्तरावर 52 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांवर आणि राज्य स्तरावर 69 टक्क्यांवरुन 90 टक्क्यांवर आणणे.
 • माध्यमिक शिक्षणाच्या पूर्तीमध्ये अपंगत्व, दुर्बल आर्थिक परिस्थिती, प्रतिकूल सामाजिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती किंवा लिंगभेद यामुळे येणार अडथळे दूर करणे.
 • सर्व माध्यमिक शाळा, शासनाने ठरविलेल्या किमान निकषांपर्यंत आणणे.
 • सन 2017 पर्यंत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे.
 • सन 2020 पर्यंत माध्यमिक शिक्षणाची गळती शून्यापर्यंत आणणे.

 

Upgrading Teacher's Knowledge and Attitude towards Reforming ScHools


UTKARSH - उत्कर्ष

 


राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची अंमलबजावणी एकात्मिक पद्धतीने राज्यांच्या सहकार्याने करावयाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सन २००९ पासून राज्यात अभियानास सुरुवात झाली आहे. या अभियानातील विविध कृती कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकरीता दरवर्षी पाच दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी "यशदा" ही कार्यरत आहे. सन २००९-१० या वर्षातील पथदर्शी प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने यशदावर सोपविली होती. यामध्ये पाच हजार मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रशिक्षणाचा समावेश होता. हे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक प्रामुख्याने शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायत राज संस्थांतर्गत माध्यमिक शाळांमधील होते.

हा पथदर्शी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सन २०१०-११ मध्ये राज्यातील शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज संस्था, खाजगी विनाअनुदानित व अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने यशदावर सोपविली आहे.  सन २०१०-११ या कालावधीत यशदातर्फे आयोजित करण्यात येणा­या प्रशिक्षण कार्यक्रमास "उत्कर्ष" असे नाव देण्यात आले आहे.