प्रशिक्षण टप्पे

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परिक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्त होण्या-या गट –अ मधील
    1. उपजिल्हाधिकारी
    2. तहसिलदार
    3. पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त
    4. अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क
    5. सहाय्यक विक्रीकर आयुक्त
    6. सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
    7. उपनिबंधक, सहकारी संस्था गट
    8. उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी(उच्चश्रेणी)
    9. मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद (अ)
    10. शिक्षणाधिकारी
    11. सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट-अ
    12. उदयोग उपसंचालक (तांत्रिक),गट-अ
    13. उपसंचालक/ प्रकल्प अधिकारी(एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी-1)/उपायुक्त् गट-अ
    14. प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी-2)/ सहायक आयुक्त, गट-अ
  • तसेच गट ब मधील
    1. नायब तहसिलदार
    2. उपअधीक्षक भूमी अभिलेख
    3. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
    4. उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
    5. सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क
    6. लेखाधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
    7. सहायक निबंधक, सहकारी संस्था
    8. सहायक गट विकास अधिकारी
    9. मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद (ब)
    10. कक्ष अधिकारी
    11. उपशिक्षणाधिकारी
    12. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी
    13. उद्योग अधिकारी(तां.), गट-ब
    14. सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकिय अधिकारी/ संशोधन अधिकारी/ गृहप्रमुख/ प्रबंधक, गट ब

    विविध 19 संवर्गातील अधिका-यांचा एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अनुक्रमे यशदा,पुणे आणि वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थामार्फत राबविणे. त्याचप्रमाणे या अधिका-यांमध्ये संघभावना निर्माण होवून,त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण व सौहार्दाचे नाते निर्माण व्हावे व त्यांची सर्वव्यापक जडणघडण व्हावी, व परिविक्षाधीन अधिका-यांमध्ये वैचारिक अधिष्ठाना्द्वारे ज्ञान, आत्मविश्वास व सौहार्द यांची जोपासना करण्याकरिता प्रशासकीय कामाकाजात पूरक ठरणारा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम गट-अ चे अधिकारी यांचेकरिता सीपीटीपी यशदा,पुणे यांचेमार्फत आणि गट ब चे अधिकारी यांचेकरिता सीपीटीपी वनामती, नागपूर यांचेमार्फत राबविला जातो.

  • 2. एकत्रित पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम (Common Foundation Training Programme)-
  • या कार्यक्रमात नेतृत्व विकास, संघ बांधणी, व्यक्तीमत्तव विकास, वैयक्तिक क्षमता विकास आणि पुरक कौशल्ये (Soft Skills), एकत्रित व लोकसहभागातून लोकशाहीतील गरजांना प्रतिसाद, मनुष्यबळ विकास, शासन संस्था, प्रशासनातील नीतीमूल्ये, आव्हानांचा सामना, प्रशासकीय कार्यवाही आणि अर्धन्यायिक कार्य, वित्तीय व्यवस्थापन,जिल्हा नियोजन,व्यापक दृष्टी विकसित करणे, समता व सामाजिक न्याय यावरील प्रश्न, विधीमंडळ कामकाज, न्यायालयीन कामकाज,माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्राची ओळख इत्यादी विषय घेतले जातील. यामध्ये घेण्यात येणारे विषय सातत्याने सहभागी प्रशिक्षण पध्दतीचा अवलंब करुन घेण्यात येतील. यामध्ये नावाजलेल्या व्याख्यात्यांचा सहभाग असेल. याबरोबरच या प्रशिक्षणामध्ये शारीरीक शिक्षण, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम(Activities),व विशेष प्रकल्प क्षेत्रभेटी यांचा अंतर्भाव राहील. हा कार्यक्रम 6 आठवडयांच्या असतो व तो गट-अ चे अधिकारी यांचेकरिता यशदा पुणे व गट-ब चे अधिकारी यांचेकरिता वनामती नागपूर याठिकाणी घेतला जातो.

  • 3. अनिवार्य संलग्नता (गांव, आदिवासी क्षेत्र, एमआरए, विधीमंडळ,लष्कर, न्यायालय):
  • राज्यातील क्षेत्रीय विविधतेची प्रत्यक्ष जाणीव होण्याच्या दृष्टीने गांव संलग्नता(Village Attachment) व आदिवासी क्षेत्र संलग्नता (Tribal Attachment) दिली जाईल. आजच्या काळात अधिका-यांच्या कामामध्ये नीतीमत्ता प्रकर्षाने रहावी यासाठी कार्मिक्‍ व प्रशिक्षण विभाग (DoPT)यांनी अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांसाठी पाचगणी येथील Moral Rearmament Centre(MRA) येथील लोक प्रशासनातील नीतीमूल्ये हा कार्यक्रम बंधनकारक केलेला आहे त्याच धर्तीवर नवनियुक्त्‍ राज्यसेवेतील अधिका-यांसाठी सदर संलग्नता ठेवण्यात येईल. विधीमंडळाच्या कामकाजाचे पूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी विधीमंडळ सचिवालय येथील संलग्नता देण्यात येईल. तसेच कामामध्ये शिस्तबध्दता व लष्करातील विभागांबरोबरील समन्वयाचा सराव व्हावा यासाठी लष्कराबरोबर संलग्नता देण्यात येईल. न्यायालयीन कामकाजाची व्यवस्थित माहिती व्हावी यासाठी न्यायालयीन संलग्नता दिली जाईल. या सर्व संलग्नता अनिवार्य राहतील. हा कार्यक्रम 5 आठवडयांचा असतो.

  • 4. व्यावसायिक खातेनिहाय/तांत्रिक प्रशिक्षण टप्पा-1:-
  • व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजेच पहिला टप्पा (Phase I) यामध्ये संबंधित अधिका-यांना त्यांच्या विभागाच्या संदर्भातील कामकाजाबाबत सखोल प्रशिक्षण दिले जाईल.

  • 5.विविध विभागांमार्फत जिल्हास्तरीय संलग्न प्रशिक्षण, स्वंतत्र कार्यभार व जिल्हास्तरीय संलग्नता :-
  • यामध्ये विभागाच्या आवश्यकतेनुसार संस्थात्मक प्रशिक्षण, जिल्हा प्रशिक्षण(District Attachemenats),वेगवेगळया संलग्नता व स्वतंत्र कार्यभार यांचा समावेश असेल. . हा कार्यक्रम 73 आठवडयांचा असतो.

  • 6. महाराष्ट्र दर्शन/दिल्ली भेट-
  • राज्यातील वेगवेगळया विकासात्मक कामांची माहिती व्हावी तसेच विकासाच्या वेगवेगळया दिशांची जाणीव व्हावी, समाजातील वेगवेगळया प्रवाहांची भेट अधिकारी म्हणून अनुभव यावा यासाठी महाराष्ट्रातील सांस्कृतिक,पर्यटन, स्थळांना तसेच औदयोगिक व विकास प्रकल्पांना भेटी दिल्या जातील. यामध्येच दिल्ली भेट आयोजित करण्यात येईल. दिल्ली भेटीमध्ये महत्वाची मंत्रालये,संसद, महत्वाचे सार्वजनिक उपक्रम यांना भेटी दिल्या जातील. . हा कार्यक्रम 2 आठवडयांचा असतो.

  • 7. पुनर्विलोकन व उजळणी टप्पा 2 तसेच परिविक्षाधीन अधिका-यांचे मूल्यांकन-(Debriefing Phase-ii)-
  • यामध्ये प्रशिक्षणाच्या वरील सर्व भांगामध्ये आलेल्या अनुभवांवरती तसेच प्रशिक्षणाद्वारे आधारित सादरीकरण करुन वैचारिक पाया पक्का केला जाईल यामध्ये मूल्यमापन(Assessment), प्रकल्प, यशस्वी गोष्टी, नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना, सादरीकरण,गटकार्य, विविध संलग्नतेमधील अनुभव या बाबींचा समावेश केला जाईल. सामायिक मुदयांविषयीचे सर्व अधिका-यांचे पुनर्विलोकन (debriefing) एकत्रितपणे घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरिता त्या विभागाशी संबंधित विशेष मुदयांबाबतचे पुनर्विलोकन स्वतंत्र दालनात आयोजित करण्यात येईल. पुनर्विलोकनासाठी संबंधित अधिका-यांस ज्या जिल्हयात क्षेत्रीय संलग्नता देण्यात आलेली असेल त्या जिल्हयाधिका-यांकडून सदर अधिका-यासंबंधी अहवाल मागविण्यात येईल व त्या अहवालानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. . हा कार्यक्रम 2आठवडयांचा असतो.