satyamev jayte image
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था
hi
एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम

प्रस्तावना-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने राज्य सेवा परिक्षेमार्फत प्रतिवर्षी निवड होणा-या गट ‘अ’ व गट ‘ब’ च्या सर्व परिविक्षाधीन अधिका-यांचे लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, मसूरी स्थित भारतीय प्रशासकीय सेवा यांच्या प्रशिक्षणाच्या धर्तीवर दोन वर्षाच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा उल्लेखनीय निर्णय महाराष्ट्र शासन व यशदा, पुणे या प्रशिक्षण संस्थेने घेतलेला आहे. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, मसूरी या प्रशिक्षण संस्थेमध्ये घेण्यात येणा-या विषयांचा समावेश एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे.

उदिदष्टे-
  • परिविक्षाधीन अधिका-यांमध्ये राज्यस्तरीय एकोपा बाणवणे.
  • परिविक्षाधीन अधिका-यांचा दृष्टीकोन व दूरदृष्टी विस्तारीत करणे.
  • परिविक्षाधीन अधिका-यांमध्ये एकसारखी नैतिक मूल्ये निर्माण करणे.
  • परिविक्षाधीन अधिका-यांचे महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी म्हणून नावलौकिक उंचावणे.
  • शासनाच्या विविध विभागांचे संघटन व कार्यपध्दतीची माहिती परिविक्षाधीन अधिका-यांना देणे.
  • शासनाच्या विविध संवर्गातील अधिका-यांमध्ये एकोपा तयार करणे.
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.टिआरएन-2013/प्र.क्र.20/15/18-ब, दिनांक 20 जानेवारी, 2014 नुसार सन 2014-2015 पासून एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम गट-अ साठी यशदा, पुणे येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार परिविक्षाधीन अधिका-यांनी राज्य शासनाच्या सेवेत रुजू होण्यासाठी संबंधित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू व्हायचे आहे. कार्यक्षम अधिकारी निर्माण होण्याच्या उददेशाने परिविक्षाधीन अधिका-यांनी महाराष्ट्र शासनाचे प्रशासकीय संघटन समजून घेण्याकरिता व आवश्यक कौशल्ये जतन करण्याकरिता एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम दोन वर्षाचा असून पुढीलप्रमाणे नियोजित प्रशिक्षण टप्प्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

अ.क्रप्रशिक्षण टप्पाकालावधी
1.पायाभूत प्रशिक्षण ( Sem-I )08 आठवडे
2.अनिवार्य संलग्नता (ग्रामीण, आदिवासी, विधिमंडळ, न्यायिक, सैनिकदल, एमआरए, पांचगणी, एनडीआरएफ) 05 आठवडे
3.तांत्रिक प्रशिक्षण ( Sem-II )08 आठवडे
4.जिल्हा संलग्नता ( Sem-III )73 (10+63) आठवडेे
5.महाराष्ट्र अभ्यास दौरा व संसद संलग्नता, दिल्ली 02 आठवडे
6.पुनर्विलोकन व उजळणी ( Sem-IV )02 आठवडे
7.खातेनिहाय संलग्नता पुढे चालू04 आठवडे
8.सुटटी02 आठवडे
एकूण104 आठवडे
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- केंद्र शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिका-यांकरिता मसुरी येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. राज्य सेवेतील परिविक्षाधीन अधिका-यांकरिता त्याच धर्तीवर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम म्हणजेच एम.ए (विकास प्रशासन) हा अभ्यासक्रम विकसीत करुन त्यामध्ये संबंधीत विषयातील विशेषीकरण (Specizlization) याचा तसेच लेखी व प्रात्यक्षीक यांचा समावेश करुन सध्याच्या दोन वर्षाच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमास मुंबई विदयापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची चौकट देण्यात आलेली आहे. सदर अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिल्यानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन, यशदा पुणे व मुंबई विदयापीठ यांच्यात त्रिस्तरीय सामंजस्य करार होवून तिहेरी सहकार्यातून हा अभ्याक्रम पार पाडण्यात येत आहे. राज्यसेवेतील अधिका-यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. आतापर्यंत या प्रशिक्षणाअंतर्गत गट अ व गट ब चे एकूण 28 संवर्ग अंतर्भूत आहेत. प्रशिक्षणाचे 6 टप्पे पूर्ण झाल्यांनतर परिविक्षाधीन अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत त्यांच्या संबंधित विभागात रुजू होतात. आतापर्यंत सन 2014-15 ते 2018-19 असे एकूण 04 बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून एकूण 385 परिविक्षाधीन अधिकारी प्रशिक्षणानंतर क्षेत्रीय पातळीवर काम करत आहेत.

शासन निर्णय – वेबलिंक
  1. दि.21 जुलै, 2017
  2. दि. 08 एप्रिल, 2019